Om Shree Gajaya Namah – Marathi Song

Lyric & Music : Saneet S More

तुझी गरज आहे रे देवा, आम्ही सर्व तुझी लेकरं
काळजी घे आमची गणराया, तुझे आम्ही भक्त आहोत खरे
जन्मभर करू आम्ही गणेशा तुझ्या नावाचे स्मरण

विनायका विघ्नहर्ता, करतो वंदन तुला देवा
गजानना गौरीपुत्रा, आहे भक्त तुझा देवा
माझी माता ही तू, माझे पिता ही तु
तूच कर्ता धर्ता,ब्रम्हविदुतमया
ॐ गजानना नम:

ॐ श्री गजाय नमः
मुंबईत लालबागच्या राजाचा मान
ॐ श्री गजाय नमः
श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार
ॐ श्री गजाय नमः
गणपतीपुळे ची मूर्ती खूप छान
ॐ श्री गजाय नमः
आमच्या डहाणू चे गणपती महान

भीती नाहीशी होते जेव्हा विचार करतो मी तुझा देवा
अधूरे माझे अस्तित्व तुझ्या विना सर्व तुझ्या हाती रे
एकांत दूर होतो तू पाठीशी आहे ह्याची जाणीव झाल्यावर

असं वाटतं देवा तुझ्या मुर्ती समोर बसू नुसतं
डोळ्यात येतं पाणी माझ्या, रूप पाहून तुझं सुंदर
देवा तुझी शक्ती अपरंपार हो, प्रकटतो तू निसर्गात
नाही शोधत तुला मंदिरात, आहेस तू आमच्या मनात

ॐ श्री गजाय नमः
मुंबईत लालबागच्या राजाचा मान
ॐ श्री गजाय नमः
श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार
ॐ श्री गजाय नमः
गणपतीपुळे ची मूर्ती खूप छान
ॐ श्री गजाय नमः
आमच्या डहाणू चे गणपती महान

गणराया तुझ्या नावाने, सुरुवात दिवसाची होते
आणि शेवट तुझ्या नावाने ही, शांतीने निजतो मी
तुझाच आधार मला, नाही कुणा वरती भरोसा
लाख आल्या जरी अडचणी ही, तु आहे पाठीशी

जरी गेलो मी कुठेही, नाही विसरणार तुला कधी
गणेशोत्सवाची सुट्टी, चांगली अकरा दिवस असावी
तुझं रूप कुठलं ही, तुझं नाव कुठलं ही
प्रेम लोकांचं तुझ्यावरी, ठेच लागली पायाला कधी
येतं नाव तुझं ओठाशी

ॐ श्री गजाय नमः


मुंबईत लालबागच्या राजाचा मान
ॐ श्री गजाय नमः
श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार
ॐ श्री गजाय नमः
गणपतीपुळे ची मूर्ती खूप छान
ॐ श्री गजाय नमः
आमच्या डहाणू चे गणपती महान

Actually, this is my first song composition, I wrote this song 10 years ago, wanted to chop off a lot of things but kept it the way I composed it initially, this is a song that made me believe in myself that I can write music, thank you for watching such a long musical piece, Have a great day…!

Please Share if you like it...!