Mazhya Vitthala Tu Ahes Kuthe Deva – Marathi Song

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (3 votes, average: 5.00 out of 5)
Loading...

गीतकार आणि संगीतकार : सनीत सा. मोरे [SANEETS]

साऱ्या जगाच्या भुकेचा विचार करतो मी

नाही जाण माझ्या जगण्याची

मी आहे, राज्यातला शेतकरी

माझ्याचं पाठीशी का दुःख हे

कोरड खाऊ झाली जमीन सारी

कसं उगवू पीक मला सांग हे आता तरी

कधी वाटतं सोडू सर्व

आणि संपवून टाकू हे आयुष्य

माझ्या विठ्ठला तू आहेस कुठे देवा

तुझ्या साठी जगतो भक्तीत रमतो देवा

मी आहे महाराष्ट्रातला शेतकरी

आमची परिस्थिती आहे खूप बिकट

शेती आहे तर पाऊस नाही

पाऊस आहे तर पाण्याचा साठा नाही

पाणी आहे तर मोटार नाही

मोटार आहे तर वीज नाही

कसं जगायचं आम्ही शेतकऱ्यांनी

कसं जगायचं

शिक्षण माझ्या लेकराच्या नशिबी नाही
विकलं दागिनं बायकोचं मी

योजना दिल्या सरकारनी
आम्हाला त्याचा काय फायदा रे

मोठ्या साहेबांशी बोलणं बिना पैसा उघड रे
फक्त करायच्यं राजकारण आमच्या नावानी आहे
मृत शेतकऱ्याचा खिसा ही नाही सोडला त्यांनी बे
नुसती खोटी आश्वासने पडती कानावरती रे

माझ्या विठ्ठला तू आहेस कुठे देवा
तुझ्या साठी जगतो भक्तीत रमतो देवा

अस्वीकरण : हे गाणे वास्तविक घटनांनी प्रेरित संपूर्ण काल्पनिक कल्पना आहे, कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्ष किंवा सरकारला लक्ष्य केलेले नाही, हे गाणे मी महाराष्ट्रातील गरीब शेतकर्‍यांना समर्पित करतो, कृपया हे गाणे केवळ मनोरंजन म्हणून घ्यावे.

Disclaimer : This song is a complete fictional idea inspired by real incidences, not targeted against any particular political party or government, I dedicate this song to the poor farmers of Maharashtra, please take this song as entertainment only.

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (3 votes, average: 5.00 out of 5)
Loading...
Please Share if you like it...!