Song : Om Namah Shivay Music : Saneet S More Lyric writer : Saneet S More
For the first time I did a jaagran of Mahashivratri this year. This an original song that I composed was a separate one but then later thought of adding Sadhguru ji’s voice to it which jelled so well with my voice, very happy with it. Firstly, I was only going to make the Om Namah Shivay namasmaran loop but it didn’t sound complete to me, so added some lyric and made it a complete musical master piece. If you like it please don’t forget to share it with at least one person, it would really help me. Thank you…!
शिक्षण माझ्या लेकराच्या नशिबी नाही विकलं दागिनं बायकोचं मी
योजना दिल्या सरकारनी आम्हाला त्याचा काय फायदा रे
मोठ्या साहेबांशी बोलणं बिना पैसा उघड रे फक्त करायच्यं राजकारण आमच्या नावानी आहे मृत शेतकऱ्याचा खिसा ही नाही सोडला त्यांनी बे नुसती खोटी आश्वासने पडती कानावरती रे
माझ्या विठ्ठला तू आहेस कुठे देवा तुझ्या साठी जगतो भक्तीत रमतो देवा
अस्वीकरण : हे गाणे वास्तविक घटनांनी प्रेरित संपूर्ण काल्पनिक कल्पना आहे, कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्ष किंवा सरकारला लक्ष्य केलेले नाही, हे गाणे मी महाराष्ट्रातील गरीब शेतकर्यांना समर्पित करतो, कृपया हे गाणे केवळ मनोरंजन म्हणून घ्यावे.
Disclaimer : This song is a complete fictional idea inspired by real incidences, not targeted against any particular political party or government, I dedicate this song to the poor farmers of Maharashtra, please take this song as entertainment only.
ॐ शिव शंकर नमः ॐ त्रिनेत्रधारी नमः ॐ आशुतोष महाराज नम: ॐ विश्लेश्वर नमः ॐ भोलेनाथ नमः ॐ गौरी शंकर नमः
This is a musical masterpiece which is composed and produced my me a long time ago, around about 7 years ago, and the lyric as many of you may know that, this is a Sanskrit stotram, the sound of tasha gives it a very strong and powerful vibe, I hope you enjoyed it, thank you for watching and have a great day…! 🙂
तुझी गरज आहे रे देवा, आम्ही सर्व तुझी लेकरं काळजी घे आमची गणराया, तुझे आम्ही भक्त आहोत खरे जन्मभर करू आम्ही गणेशा तुझ्या नावाचे स्मरण
विनायका विघ्नहर्ता, करतो वंदन तुला देवा गजानना गौरीपुत्रा, आहे भक्त तुझा देवा माझी माता ही तू, माझे पिता ही तु तूच कर्ता धर्ता,ब्रम्हविदुतमया ॐ गजानना नम:
ॐ श्री गजाय नमः मुंबईत लालबागच्या राजाचा मान ॐ श्री गजाय नमः श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार ॐ श्री गजाय नमः गणपतीपुळे ची मूर्ती खूप छान ॐ श्री गजाय नमः आमच्या डहाणू चे गणपती महान
भीती नाहीशी होते जेव्हा विचार करतो मी तुझा देवा अधूरे माझे अस्तित्व तुझ्या विना सर्व तुझ्या हाती रे एकांत दूर होतो तू पाठीशी आहे ह्याची जाणीव झाल्यावर
असं वाटतं देवा तुझ्या मुर्ती समोर बसू नुसतं डोळ्यात येतं पाणी माझ्या, रूप पाहून तुझं सुंदर देवा तुझी शक्ती अपरंपार हो, प्रकटतो तू निसर्गात नाही शोधत तुला मंदिरात, आहेस तू आमच्या मनात
ॐ श्री गजाय नमः मुंबईत लालबागच्या राजाचा मान ॐ श्री गजाय नमः श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार ॐ श्री गजाय नमः गणपतीपुळे ची मूर्ती खूप छान ॐ श्री गजाय नमः आमच्या डहाणू चे गणपती महान
गणराया तुझ्या नावाने, सुरुवात दिवसाची होते आणि शेवट तुझ्या नावाने ही, शांतीने निजतो मी तुझाच आधार मला, नाही कुणा वरती भरोसा लाख आल्या जरी अडचणी ही, तु आहे पाठीशी
जरी गेलो मी कुठेही, नाही विसरणार तुला कधी गणेशोत्सवाची सुट्टी, चांगली अकरा दिवस असावी तुझं रूप कुठलं ही, तुझं नाव कुठलं ही प्रेम लोकांचं तुझ्यावरी, ठेच लागली पायाला कधी येतं नाव तुझं ओठाशी
ॐ श्री गजाय नमः
मुंबईत लालबागच्या राजाचा मान ॐ श्री गजाय नमः श्रीमंत पुण्याचा दगडूशेठ फार ॐ श्री गजाय नमः गणपतीपुळे ची मूर्ती खूप छान ॐ श्री गजाय नमः आमच्या डहाणू चे गणपती महान
Actually, this is my first song composition, I wrote this song 10 years ago, wanted to chop off a lot of things but kept it the way I composed it initially, this is a song that made me believe in myself that I can write music, thank you for watching such a long musical piece, Have a great day…!